चोपडा येथील द्वारकाधिश मंदिरात झुला महोत्सव

0

१२५ वर्षांची परंपरा ; वैष्णव भाविकांची गर्दी

चोपडा ( प्रतिनिधी) – येथील गुजराथी गल्लीतील स्थित १२५ वर्ष जुने द्वारकाधिश मंदिरात (हवेली) श्रावण मासानिमित्त महिनाभर झुला महोत्सव साजरा केला जातो या झुला ( हिंनंदौरा) महोत्सवात रोज नवनवीन देखावे सजवले जातात. हे देखावे पाहण्यासाठी वैष्णवपंथी भाविकांची मोठी गर्दी असते.
शहरातील गुजराथी गल्लीतील जवळपास १२५ वर्ष जुने द्वारकाधिश मंदिर (हवेली) असून येथे वर्षभरात अनेक कार्यक्रम होत असतात. ठाकुरजीची मूर्ती ( श्रीकृष्णाचे अवतार ) असून दर वर्षी श्रीकृष्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. तसेच श्रावण मासात संपुर्ण महिनाभर झुला महोत्सव असतो. यात वैष्णवपंथीच्या महिला रोज नवनविन सजावट करत असतात. ही सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सजावट करत असताना कुठेही चिपकवण्यासाठी कोणतेही साधन वापरले नसते. ही सजावट फक्त एक बारीक दोराने बांधण्याचे काम करून केली जाते. या कला कृतीचे काम ठराविक महिलाच अवघ्या दोन ते तीन तासातच करून घेतात. ह्या झुला महोत्सवात कधी केळीचे पिन काढुन तर केळीचे कच्ची कळ्या, कधी फळफ्रूट, ड्रायफ्रूट, भाजीपाला, आणि शेवटच्या दिवशी काचेच्या तुकड्या पासून ही सजावट केली जाते. ही सजावट इतकी अप्रतिम असते की, एखाद्या कलाकारांने काम केले असावे असे त्या सजावटीत काम दिसत असते नक्षीदार, कोरीव, कलरिंग, आणि मांडणी अश्या विविध अंगांनी हा देखावा सजविला जात असतो. ही सजावट दुपार पासून करण्यासाठी सुरुवात केली तरी संध्याकाळ पर्यंत पूर्ण होऊन संध्या. दर्शनासाठी खुले करत असतात. या वेळी वैष्णव पंथी सह परिसरातील अनेक जाती धर्माचे भाविक येत असतात. ही सजावट करण्यासाठी अश्‍विनी गुजराथी, सोनल गुजराथी, तेजु गुजराथी, सेजल गुजराथी, शैला गुजराथी, अर्चना गुजराथी यांच्यासह अनेक महिला सहकार्य करीत आहे.