चोपड्यात श्री विसर्जन शांततेत

0

पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप

चोपडा (प्रतिनिधी)- चोपडा येथील पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन आज शांततेत पार पडले. शहरातील विविध मंडळांनी भव्य मिरवणूका काढुन गणरायाचा उत्सव आनंदाने साजरा केला. शहरातील नागरीकांना लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणून जड अंत:करणाने निरोप दिला. चोपडा शहरातील श्रीचे विसर्जन पाचव्या दिवशी करण्यात येते. विविध मंडळांनी सुंदर अशी आरास सजविली होती. ढोलताश्यांचा गजरासह गुलालाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली होती. शिवसेना, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस पंक्षानी मंडळाच्या अध्यक्षांचा गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या उत्साहात अधीक भर देण्यात आला. विशेष शिवसेनेचा आ.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार कैलास पाटील या दोन्ही गटाचे स्टेज समोरासमोर दिसुन आले.


रात्री उशिरापर्यंत गणरायाचे विसर्जन
शहरात ५० सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली होती. आज सकाळी ३ वाजेच्या दरम्यान शहर तलाठी कार्यालयाजवळ येऊन मुख्य मुख्य रस्त्यावरून मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली होती. हि मिरवणूक मेनरोड, बोहरा गल्ली, आझाद चौक,पाटील दरवाजा,आंबेडकर चौक,तसेच शिवाजी चौकातुन मार्गस्थ होऊन मध्यरात्री पर्यंत तापी नदीचा पुलावरुन क्रेनचा सहाय्याने श्रींचे विसर्जन करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्ताकामी ३० विविध दर्जाचे अधिकारी, ३०० पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, आरपीएफ – १ कंपनी, एसआरपीएफ – २ प्लॅटून, दंगा नियंत्रण पथक – २ प्लाटून, स्ट्राईकींग फोर्स – २ प्लॅटून असा तगडा बंदोबस्त पोनि विनायक लोकरे यांनी तैनात केला होता. मिरवणुकीत डिजे आणि मोठ्या आवाजातील वाद्यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करताना दिसुन आले, संशयित वस्तू व इसम आढळून आल्यास पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले होते.