शेतकर्‍यांच्या बिकट परिस्थितीत आंब्याचे झाडच मदत करायचा

0

हापूस आंबा महोत्सवाचे माजी आ. अरूणभाई गुजराथींच्या हस्ते उद्घाटन

चोपडा ( प्रतिनिधी )- पूर्वीच्या काळात शेतकर्‍यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली तर बांधावर लावलेले आंब्याचे झाडाचे उत्पादन इतके असायचे की, शेतकर्‍यांला जीवनदान मिळून जायचे म्हणून पूर्वीचे लोक सांगत होते की, शेतकर्‍यांचा मदतीला आंब्याचे झाड येत असत. असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
चोपडा पिपल्स को ऑफ बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट तर्फे दि १७ ला सकाळी १० वाजता भव्य सेंद्रिय हापूस आंबा महोत्सव येथील बोथरा मंगल कार्यालयात पार पडले त्यावेळेस ते उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर रत्नागिरीचे प्रगतिशील शेतकरी राजेश पालेकर, जळगावचे काजूचे व्यापारी राहुल मणियार, नगराध्यक्षा मानिषा चौधरी, राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे जगन पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, ट्रस्टचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, संचालक प्रविणभाई गुजराथी, सामाजिक कार्यकर्त्या सविता जाधव, राजेंद्र भाटिया आदी होते. रत्नागिरीची जिल्ह्याची अर्थव्यवस्था आंबा आणि माश्या वर अवलंबून आहे. किती शेती आहे याला महत्व नाही. तर रत्नागिरीत किती आंब्याची झाड यावर त्यांची श्रीमंती अवलंबून आहे. आंब्याना पाणी कमी लागते आणि कमी पाण्यात लाखोंचे उत्पन्न काढणारे शेतकरी रत्नागिरीत आहेत. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कोरडंवाहु आंबा, चिंच, बोर, कहिठ असे विविध फळ घ्यायला हवे असे प्रतिपादन गुजराथी यांनी केले यावेळी रत्नागिरीचे शेतकरी राजेश पालेकरं यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सेंद्रिय खतापासूनच पिके पिकवली गेली पाहिजे. भारतात सर्वात जास्त केमिकल्स वापरणारे पंजाब राज्य असून आणि सर्वात जास्त सेंद्रिय खत वापरणारे राज्य मिझोरम हे आहे. अजूनही १६ राज्यात हापूस आंबा माहीतच नाही. आता कमी उत्पन्न आले तरी चालेल परंतु आपण विषारी उत्पादन देऊ नका असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी तर आभार प्रदर्शन प्रविणभाई गुजराथी यांनी केले यावेळी अनेक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.