पाणीप्रश्‍न मिटविण्यासाठी नदी, नाल्याचे खोलीकरण करा

0

जलसंधारण कृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

चोपडा (प्रतिनिधी ) चोपडा तालुक्यातील पाणी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधणेसाठी व प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी तालुक्यातील नदी आणि नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी जलसंधारण कृती समितीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जलसंधारण कृती समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाण्याचा थेंब अन् थेंब अडविणे गरजेचे आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शोषखड्याद्वारे पाणी जिरविणे, विहीर पुनर्भरण इत्यादी कामे हाती घेण्यात आली. या अनुषंगाने लोकसहभागातून चोपडा परिसरातील वराड नाल्याचे व शहरातील रत्नावती नदीचे खोलीकरण करण्याबाबत चळवळीचे कार्यकर्ते आर. डी. पाटील, सागर बडगुजर यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी डॉ. विकास हरताळकर, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, आर. एन. पाटील, गोपाल चिमण ठाकरे, रामचंद्र भालेराव, एस.एच. पाटील, डॉ. सुधीर चौधरी, राजेंद्र बडगुजर, यशवंत चौधरी, सुधीर पाटील, लक्ष्मण पाटील, बी. व्ही. पाटील, संजय बारी, विलास पाटील, नंदलाल मराठे, पंकज शिंदे यासह चळवळीचे कार्यकर्ते सागर बडगुजर, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.