चोपडा आम आदमी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी समाधान सोनवणे तर उपाध्यक्षपदी मुकुंदराव पाटील व समाधान पटाईत यांची एकमुखाने निवड….
चोपडा प्रतिनिधी :—
येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जिल्ह्याचे सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे व युवा मार्गदर्शक रईस खान यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीत नवीन सदस्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला .
चोपडा तालुका आम आदमी पक्षाचे तालुका संयोजक आर डी पाटील यांची आम आदमी पक्ष शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक पदी निवड झाल्याने तालुका संयोजक पद रिक्त झाले. नवे तालुका संयोजक म्हणून समाधान बाविस्कर यांची एकमुखाने निवड करण्यात आली तर तालुका सह संयोजक म्हणून चहार्डी येथील मुकुंदराव पाटील ( पूर्व भाग ) , तालुका सहसंयोजक खर्डी येथील समाधान पटाईत ( पश्चिम भाग ) , सचिव – रामचंद्र भालेराव ( माजी शिक्षण विस्तार अधिकारी ) आदींची निवड करण्यात आली.
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात नवीन सदस्यांचा पक्ष प्रवेश , तालुका कार्यकारिणीत बदल , तसेच २९ जून रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विभागीय मेळाव्यास चोपडा तालुक्यातून जास्तीत जास्त सदस्य , कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. नवीन सदस्य नोंदणी करण्यावर भर द्यावा . येत्या काळात प्रत्येक वॉर्डांत व प्रत्येक गावात आम आदमी पक्षाची शाखा उघडून कार्यकारिणी गठित करून बोर्ड लावणे , नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणे , दर पंधरवाडा , महिन्यात विविध समस्याबाबत निवेदने देणे , लोकांच्या समस्या सोडविणे , पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीसाठी विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा सहसंयोजक ) , रईस खान ( युवा मार्गदर्शक – जळगाव ) , आर डी पाटील ( शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक ) , समाधान बाविस्कर ( तालुका संयोजक ) , मुकुंदराव पाटील ( तालुका सह संयोजक ) , समाधान पटाईत ( तालुका सह संयोजक ) , रामचंद्र भालेराव ( सचिव ) , सुधीर पाटील ( शहर संयोजक ) , शैलेंद्र पवार , कमलेश बारेला , वेडूराम बारेला , शशिकांत पाटील यांसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीचे प्रास्ताविक विठल राव साळुंखे यांनी केले व सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर पाटील यांनी केले…