‘दया कुछ तो गडबड हैं’ हा शब्द आता ऐकू येणार नाही; सीआयडी मालिका घेणार निरोप

0

मुंबई- सीआयडी ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला ही मालिका अगदी खरी उतरली होती. पण आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवटचा भाग २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एसपी प्रद्युमन, दया, अभिजीत या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. सीआयडी या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता. ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे.