अखेर चित्रपट गृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवसापासून पहा सिनेमा

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच अनलॉक देखील करण्यात आले, त्यात टप्प्याटप्प्याने अनेक उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र चित्रपट गृहे सुरु करण्याबाबत कोणतेही निर्णय झालेले नव्हते. दरम्यान आता अनलॉक ५ चा टप्पा सुरु झाला असून त्या अंतर्गत चित्रपट गृहे सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट गृहे सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करत नियमावली जाहीर केली. केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एसओपी जारी करण्यात आली असून 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे.

या आहेत नियमावली
चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, मंत्रालयाला वाटते की, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे.

दरम्यान, मार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-5 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.