नवी दिल्ली- ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी संस्कारी बाबू म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराच्या आरोप केले आहे. आलोक नाथ यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र सिने अॅण्ड आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीआयएनटीएएने (सिंटा) या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत, आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी केले आहे.
Dear @vintananda I am so so sorry. As @CintaaOfficial a show-cause Notice will be sent to @aloknath first thing in the mrng, why he shudnt b expld. Unfortunately we’ve to follow the due process. I urge u to file a complaint against this vile creature, we extend u full support.
— सुशांत सिंह sushant singh سشانت سنگھ (@sushant_says) October 8, 2018
१९९४ मध्ये बॉलिवूड व टीव्हीच्या संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप विनता नंदा यांनी केला आहे. या प्रकरणाबद्दल त्यांनी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची गंभीर दखल घेत सीआयएनटीएएचे सुशांत सिंह यांनी ट्विट करत, आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
‘प्रिय, विनता नंदा मी माफी मागतो. आलोक नाथला आज सकाळी तुम्हाला बडतर्फ का केले जावू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. दुदैवाने आम्हाला या प्रक्रियेतून जावे लागते. तुम्ही याप्रकरणी तक्रार दाखल करावी, अशी मी विनंती करतो. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, करू,असे सीआयएनटीएएचे सरचिटणीस सुशांत सिंह यांनी विनता नंदा यांना उद्देशून लिहिले आहे.
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर प्रकरणातही सीआयएनटीएएने तनुश्री दत्ताची माफी मागितली होती. पण सीआयएनटीएएच्या नियमांचा हवाला देत, या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली होती. यापुढे अन्य कुठल्याही कलाकारावर असा अन्याय होणार नाही, यासाठी कटिबद्ध असल्याचेही सीआयएनटीएएने म्हटले होते. त्यानुसार, विनता नंदाप्रकरणी सीआयएनटीएएने तातडीने पाऊले उचलत आलोक नाथ यांना नोटीस बजावले आहे. आता आलोक नाथ यावर काय उत्तर देतात, ते पाहूच.