फैजपुर नगरपरिषदेत भोंगळ कारभाराला नागरिक कंटाळले चौकशीची मागणी

 फैजपूर प्रतिनिधी l

येथील गेल्या चार महिन्यापासून मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांची बदली झाल्यापासून कोणतेही नियंत्रण नगरपरिषदेत राहिलेले नाही वेगवेगळ्या समस्या बाबत नागरिक कंटाळले कचरा साफसफाई दिवाबत्ती वाहन चालक गटारी तुंबल्या असून नागरिकांना कोणतीही सुविधा मिळत नाही आहे केवळ नगरपरिषदेत या सर्व बाबींचे लाखो रुपयांचे बिले मात्र सादर केले जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून या भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कोणतेही बिले आता अदा करू नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या चार महिन्यापासून मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांची बदली झाल्यामुळे नगरपरिषदेत अध्याप कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नसून तात्पुरता पदभार भुसावळ चे मुख्य अधिकारी महेश वाघमोळे यांना देण्यात आलेला आहे त्यांनी सखोल चौकशी करूनच दिले अदा करावी अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली असून शहरातील कचरा साफसफाई होत नसून मात्र लाखो रुपयांची बिले कसे अदा होत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून दिवाबत्तीचे लाखो रुपयांची बिले गटारी तुंबल्या असून कोणतीही फैजपूर नगरपरिषदेच्या नागरिकांना सुविधा मिळत नसून सुद्धा केवळ बिले काढण्याचे काम नगरपरिषदेत सुरू असल्याचे चित्र आहे फैजपुर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे