नागरिकांनी केला मुख्याधिकारी मा. श्री संदीप चिद्रवार यांचा सत्कार

भावपूर्ण वातावरण शास्त्रोक्त पद्धतीने केला सत्कार

भुसावळ प्रतिनिधी l

भुसावळ येथून नुकतेच बदली झालेले मुख्याधिकारी संदीप जी चिद्रवार यांचा भुसावळातील विविध संस्था चे पदाधिकारी एकत्र येत अॅड निर्मलजी दायमा यांच्या निवासस्थानी घरगुती स्वरूपात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी शहर संघाचे राधेश्याम लाहोटी डॉ प्रा सुनील नेवे बार असोशिएशन चे अॅड तुषार पाटील गोकूळ अग्रवाल गौतम चोरडीया जयंती भाऊ सुराणा सुरेंद्र सिंग पाटील महेश चौधरी दीपक टेकवाणी अभय कोटेचा अॅड गोकुळ अग्रवाल डॉ कुशल पाटील राजेश बाफना कलीम पायलट सुनील जोशी आरती चौधरी विनिता वाणी .चौधरी निर्मल जी दायमा यासोबतच अन्य नागरिक व महिलाही उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाडाचे पूजन सत्कारार्थी संदीप चिद्रवार व सौ चिद्रवार हस्ते करण्यात आले यानंतर काही मान्यवरांनी मुख्याधिकारी साहेबांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगत आतून व्यक्त केला . यानंतर आरती चौधरी व विनिता नेवे यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले . यांनतर भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील यांचाही याप्रसंगीमाननीय मुख्य अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी नाना पाटील यांनी मा . मुख्याधिकारी यांनी पर्यावरणाच्या बाबत काही योजना राबविल्या यामध्ये गणपतीची मूर्ती द्या व वृक्ष घ्या त्याचबरोबर एक विद्यार्थी एक झाड अस्थिव रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष विविध ठिकाणी वृक्ष लावण्यासाठी सहकार्य कोणते वृक्ष लावत याविषयी चर्चा करत असत असे काही उपक्रम राबविण्यासाठी माननीय मुख्याधिकारी संदीप जी चिद्रवार यांचे सहकार्य मिळत असे .

मुख्याधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना भुसावळमध्ये चांगले वाईट असे जरी असले तरी चांगल्या लोकांच्या सहकार्यामुळे काम करण्यास उत्सवा मिळाला बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या करण्याचा प्रयत्न केला .काही गोष्टी होऊ शकले नसेल .त्या भविष्यात होतील ही पण भुसावळकरांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे कार्य करू शकलो व भुसावळ नगरपालिकेला माझी वसुंधराच्या अंतर्गत माझ्या कार्यकाळात पुरस्कार व भुसावळ शहराचे नावलौकिक झाले याचे मला खूप समाधान आहे याचे श्रेय हे भुसावळकर जनतेचे आहे ज्यांनी यासाठी योगदान दिलेले आहे अशांना मी हा पुरस्कार समर्पित करतो .असे मनोगतुन व्यक्त केले यावेळी ते भावविवश झाले होते .

अशा कार्यक्रमांमुळे अधिकाऱ्यांनाही उत्साह येतो व आपल्या पाठीशी चांगले नागरिक उभे आहेत यामुळे ते चांगल्या प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात .

यावेळी अॅड निर्मलजी दायमा यांनी आभार मानताना चिद्रवार साहेबांचे संबंध आमचे घरा सारखे होते .त्यांचा कामाचा अनुभव मी जोडून घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी अनेक बाबींमध्ये डॅशिंगने निर्णय घेतलेली आहेत असे दायमा यांनी सांगितले .डॉ . प्रा . सुनील त्यांनी थोडक्यात ते आले त्यांनी नागरिकांची मने जिंकली आणि ते जात आहेत यातच त्यांचे खूप मोठे कार्य आहे भुसावळ नगरपालिकेत लोकांची मने जिंकणारा अधिकारी चिद्रवार हे होते असे त्यांनी सांगितले . अत्यंत उत्साहाने भावपूर्ण वातावरणात त्यांना शुभेच्छा व सदिच्छा देण्यात आल्या