शहर वाहतूक शाखेची अलर्ट पोलसिंग ; चोरीची दुचाकी गसवली

0

जळगाव- शहर वाहतूक शाखेतर्फे सोमवारी विना नंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकींवर कारवाईची मोहिम राबविण्यात आली. दरम्यान या कारवाई तालुका पोलिसात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी कर्मचार्‍यांना गवसली मात्र कागदपत्र घेऊन येतो, असे म्हणत सदरची चोरीची दुचाकी बाळगणारा संशयित वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला आहे. दरम्यान वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभर कारवाई करत एकूण 10 मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मानव सेवा शाळा परिसरात राहणार्‍या आरती राठी यांची (एम.एच. 19, डी.ए. 6486) नंबरची अ‍ॅक्टीवा गाडी राहत्या घरापासून चोरीस गेली आहे. या बाबत त्यांनी दि. 11 रोजी तालुका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दि. 15 रोजी वाहतूक शाखेतर्फे शहरात विना नंबर प्लेट व फॅ न्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र बँकेसमोर विना नंबरप्लेटची क्टीवा गाडी आढळून आली. वाहतूक पोलिसानी गाडी जवळ जात विचारणा केली असता एका तरुणाने गाडी माझी आहे, असे सांगितले. यावर कर्मचार्‍यांनी कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे घरी आहेत ते घेऊन येतो, असे म्हणत त्या ठिकाणावरुन पाय काढला. बराच वेळ होऊनही तो तरुण परत न आल्याने कर्मचार्‍यांनी गाडी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली असता. येथे गाडीच्या डिक्कीत एमएच 19 डीए 6486 या क्रमांकाची नंबर प्लेट आढळली. नंबर प्लेटच्या आधारावर पोलिसांनी माहिती मिळविली असता सदरची दुचाकी ही आरती राठी यांची असून ती चोरीस गेल्याची बाब समोर आली.