जिल्हा कारागृहातील कैद्यांना सिव्हिलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट

0

जिल्हा रुग्णालयात आरोपी कक्ष सोडून वार्ड क्रमांक 9 मध्ये होताहेत कैदी रुग्ण दाखल ; बंद दरवाजाआड कैद्यी मारताहेत मजा

जळगाव : हजा मजा मारण्यासाठी कैद्याना सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे जिल्हा रुग्णालय. यापूर्वी कारागृहातून बाहेर पडल्यावर चिंग्या उर्फ सुरेश आळंदे याने एकाला मारहाण केल्याचे समोर आल होते. याप्रकरणा दोन पोलीस निलंबित करण्यात आले आहे. रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास खुद्द पोलीस अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयातला भेट दिल्यावर वार्ड क्रमांक 9 मध्ये खूनाच्या घटनेतील तीन कैदी रुग्ण दाखल असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयता आरोपी कक्ष हा स्वतंत्रणपणे असतानाही केवळ व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी म्हणून कैदी रुग्णांना वार्ड क्रमांक 9 मध्ये दाखल केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आजारपणाचे नाटक करून दाखल होणार्‍या कैद्याच्या सोयीसाठी चक्क खोलीच बदलल्याचे समोर आले आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात या वॉर्डाचा आरामकक्ष म्हणून वापर करणार्‍या आणि खर्‍या खुर्‍या आजारी संशयितांच्या मुक्कामाची माहिती पोलिस अधीक्षकांनी मागवली आहे.

दरवाजा बंद अन् बाहेर पोलीस तैनात
वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात कारागृहात असताना आजारी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कैदीवॉर्ड तयार करण्यात आला आहे. कैदी वॉर्डाबाबत अनेक तक्रारी येत असल्याने आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितांनी या कैदीवॉर्डाला आराम कक्ष बनवून टाकला असून, दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षकांनीच रविवारी या कक्षाची पाहणी केली. पोलिस तैनात असलेल्या या कक्षात प्रवीण राजू निंबाळकर, मिथुन बारसे, आकाश सपकाळे, लखन मराठे असे चार संशयित उपचार घेत असून, त्यात खुनाच्या संशयितासह इतर गुन्ह्यातील तीन संशयितांचा समावेश आहे. डॉ. उगलेंनी या संशयितांची पूर्ण माहिती घेतली.

खोली बदलल्याची चर्चा
वॉर्ड क्रमांक नऊमध्ये पूर्वेच्या दिशेला कैद्यांसाठी स्वतंत्र खोली करण्यात आली आहे. त्यास खास लोखंडी ग्रिल लावण्यात आले असून, कैदी पळून जाऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या असताना रुग्णालय प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच पूर्वेकडील ही खोली खाली करून, कोपर्‍यात पश्‍चिमेकडील खोली दिली आहे. कैद्यांवर कोणाची नजर जाऊ नये, ग्रीलचे दार नसल्याने दार बंद केल्यानंतर आत कोण काय करतय, भेटण्यासाठी कोण आलयं याची माहिती होऊ नये, यासाठी ही खोली बदलल्याची चर्चा आहे.

अधीक्षकांची सरप्राईज भेट
चंद्रकांत पाटील खून खटल्यात जामिनावर सुटलेला सनी वसंत पाटील ऊर्फ चाळीस, चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या, लखन मराठे ऊर्फ बोबड्या असे सहआरोपी असून, श्याम दीक्षितच्या खुनाच्या गुन्ह्यात सनी पाटीलला अटक झाली आहे. या गुन्ह्यात पडद्यामागे काही आरोपी आहेत काय, याचा शोध सुरू असून, सनीचे साथीदार कैदीवॉर्डात आरामासाठी आले असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिस अधीक्षकांनी ही भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.