मुंबई-रेणके आयोगावर टीका केल्याप्रकरणी विधानपरिषद सदस्य आमदार हरीभाऊ राठोड यांच्यावर मानहानीचा दावा ठोठावण्यात आला आहे. रेणके आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी हा दावा टाकला आहे.
रेणके आयोगामुळे भटक्या-विमुक्त जातींचे नुकसान झाले अशी टीका सोशल मीडिया आणि काही वृत्तपत्राच्या माध्यमातून केली होती. यापूर्वी देखील हरीभाऊ राठोड यांनी वारंवार रेणके आयोगावर शंका व्यक्त केली, अहवाल दडपल्याचा आरोप केला असल्यानं आपण वकिलामार्फत कायदेशीर करत असल्याची माहिती बाळकृष्ण रेणके यांनी दिली आहे. तर आपण केलेली टीका ही कुणावर वैयक्तिक टीका नसून संपूर्ण आयोगावर केलेली टीका आहे, लोकशाहीत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी कायदेशीर लढाईस तयार असल्याचं प्रतिउत्तर आमदार हरीभाऊ राठोड यांनी दिले आहे.