पर्यावरण दिनी वढोदा वनविभागाकडून चारठाना वनपरिक्षेत्रात साफसफाई अभियान

मुक्ताईनगर प्रतिनिधी l

दिनांक ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भवानी माता पर्यटनस्थळ चारठाणा येथे वनपरिक्षेत्र वडोदा यांचे कडून साफसफाई करण्यात आली

वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चारठाणा भवानी माता वनपरिक्षेत्रात भवानी माता मंदिर परिसरातील तलाव जवळील प्लास्टिक पिशव्या ,निर्माल्य,या परिसरातील बगीचा व निसर्ग पर्यटन क्षेत्रात साफसफाई करून या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण विषयक प्रतिज्ञा घेऊन पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .

यावेळी वढोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे ,वनपाल पचापांडे व वनपरीक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच संयुक्त वनव्यस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्तीत होते