क्लिकचा डेटा साक्षरता शिक्षण कार्यक्रम

0

मुंबई : क्लिक Qlik® या डेटा विश्लेषणात अग्रेसर असलेल्या कंपनीने आज त्यांचा नवा डेटा साक्षरता शिक्षण कार्यक्रम उपलब्ध होत असल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे व्यक्तीगत पातळीवर किंवा संस्थांना वाढत्या डेटा-केंद्रित जगतातील व्यवसाय परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्याच्या लहरी अंतर्भूत करण्यासाठी मदत मिळते.

जगभरातील नेते, कामगार आणि विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेच्या विश्लेषणात योग्य भूमिका घेण्यासाठी स्वतःला उत्तमरित्या घडवण्याचा हा एक प्रयत्न असून क्लिक यापूर्वीच शैक्षणिक क्षेत्रात सहभागी झाला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणातील समुदायासाठी मूल्यवर्धित सेवांमधील गुंतवणूक यापुढेही सुरू ठेवली जाणार आहे.

समजावून सांगण्याची क्षमता, विश्लेषण आणि आत्मविश्वासाने डेटा वापरण्यासाठी प्रत्येकाला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या नव्या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. तसेच, संस्थांमध्ये डेटा साक्षरतेची संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीही याची मदत होईल.

क्लिकचे डेटा साक्षरता प्रमुख जॉर्डन मॉरो म्हणाले, “क्लिकचा समर्पित डेटा साक्षरता शिक्षण कार्यक्रम आणि मोफत शिक्षणाची मात्रा जी आम्ही उपलब्ध करीत आहोत ती एक उत्तम संधीच आहे. सर्व इकोसिस्टिम्स आणि उद्योगांचे मूल्य वाढवण्याची आमची संकल्पना आहे. डेटाचे वाचन करू शकणाऱ्या, तो समजून घेणाऱ्या, त्याचा उपयोग करणाऱ्या आणि डेटाशी परिणामकारक युक्तिवाद करू शकणाऱ्या कुशल कामगारांना एकत्रित डेटा अॅक्सेस करून विश्लेषण अर्थव्यवस्था आपली पूर्ण क्षमता गाठू शकेल असा मला विश्वास आहे