जामने प्रतिनिधी l
जामनेर शहरात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक उत्सवाचे औचित्य साधुन पारंपारिक पालखी शोभायात्रा व भव्य राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आज जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते जेष्ठ शुद्ध त्रयोदशी २ जुन २०२३ सकाळी ९ वा. सोनेश्वर महादेव मंदिर, सोनबर्डी येथे ध्वारोहणाचा सोहळा संपन्न झाला दि ६ जुन २०२३ संध्या ५ वा. गांधी चौक ते सोनेश्वर महादेव मंदिर सोनबर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज पालखी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे तसेच संध्या ७ वा. सोनेश्वर महादेव मंदिर, येथे श्री शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार असून बहुसंख्य शिव प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवछत्रपती राज्यभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे ध्वजारोहण प्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील , भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, आतिश झाल्टे,सुहास पाटील, श्रीराम महाजन ,बाबुराव हिवराळे, किशोर झांबरे ,दीपक तायडे, कैलास पालवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच श्री शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते