बंगळूर: कर्नाटकमधील राजकीय घडामोडीला दररोज नवनवीन वळण लागत आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान भाजप नेते माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. कॉंग्रेस-जेडीएसच्या आणि अपक्ष असे १५ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे, सरकारकडे विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांनी भाजपला पाठींबा देत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.