ममता बनर्जी यांच्या जीवनावरील “दीदी: द अनटोल्ड ममता बॅनर्जी” या पुस्तकाचे प्रकाशन

0

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांच्या जीवनचारित्र्यावर आधारित पुस्तकाचे काल प्रकाशन करण्यात आले. वरिष्ठ पत्रकार शुतापा पॉल यांनी ममता बनर्जी यांची बायोग्राफी लिहिली आहे. “दीदी: द अनटोल्ड ममता बॅनर्जी” असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. या पुस्तकात देशातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक ममता बनर्जी यांना दाखविण्यात आले आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच्या उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. अद्वितीय राजकीय शैली, त्यांच्या संघर्षांचे वर्णन करण्यात आले आहे.

याबरोबरच, पुढील वर्षी 201 9 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी या पुस्तकाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.