मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ऑनलाईन संवाद झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यात सहभाग नोंदविला. कोरोना लसीच्या निर्मितीनंतर त्याचे वितरण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्या संपर्कात असून कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ते जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तयारी सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांना दिले आहे.