मुक्ताईनगर प्रतिनिधी l
गाव खेड्यातील प्रत्येक नागरिकाला व लाभार्थ्याला लाभ मिळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्य कुशल त्याने काम करत योजना राबवण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी अर्थातच शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाच्या आढावा बैठक प्रसंगी केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, बोदवडचे तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक शरद इंगळे,परीक्षा विहीन तहसीलदार संदीप माकोडे, सहाय्यक गट विकास अधिकारी आढागळे, गटशिक्षण अधिकारी बी डी.धाडी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई,स्वीस सहायक प्रवीण चौधरी ,आनंदराव देशमुख, अफसर खान ,नगरसेवक संतोष मराठे,राजेंद्र हिवराळे, नवनीत पाटील, पंकज राणे, महेंद्र मोंढाळे यासह मोठ्या संख्येने विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका छताखालीच या योजना असून राजकीय इच्छाशक्ती खूप आहे पण प्रशासनाची तेवढीच मदत आवश्यक असून प्रांत अधिकारी हे स्वतः सामान्य कुटुंबातील असल्याने व शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांनी पुढच्या मिटींगला अधिकारी हजर नसले तर त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेशच दिला जाणार नाही अशी तंबी देखील दिली.
याप्रसंगी रेशन धान्य दुकानदारांच्या संदर्भातील तक्रारी मांडण्यात आल्या. काळ्या बाजारात जाणारा धान्य यासंदर्भात ही तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षकांची तालुक्यात रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावे काही शाळांना शून्यशिक्षकी शाळा देखील झालेल्या आहेत, लहान बालकांचे आधार अपडेट नसल्याने त्यांना पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार इच्छापुर गावचे सरपंच गणेश थेटे यांनी केले. तसेच केळीसाठी शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना असून त्यांची अंमलबजावणी करण्याची देखील बैठकीत ठरवण्यात आले. शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असून त्याचेही लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन आमदार यांनी केले. विविध योजनातील लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन जून रोजी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिली. केळीचा पहिल्यांदाच फलोत्पादन मध्ये समावेश करण्यात आला असून त्या संदर्भातही योजना राबवण्याचे आवाहन कृषी विभागाला आमदारांनी केले. आदिवासींना विविध दाखल्यांसाठी १९५० पूर्वीच्या जन्म तारखेच्या दाखल्याची मागणी केली जाते जर त्यांच्याकडे दाखले असते तर ही योजना गाव पातळीवर राबवली गेली असती का?असा प्रति सवाल त्यांनी प्रांताधिकारी यांना केला. त्यामुळे या नियमात शिथिलता आणण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. बर ठीक आहे मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये कृती विकास आराखडा मंजूर नसताना प्लॉट येणे केले जात असून यामध्ये आर्थिक व्यवहार केले जात असल्याची तक्रार संतोष मराठे यांनी आढावा बैठकीत केली तसेच यापूर्वी देखील 2021 मध्ये लेखी तक्रार केल्यानंतरही अद्यापही नगरपंचायत तर्फे उत्तर देण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील शौचालयाच्या बांधकामाचे हप्ते बाकी असल्याची तक्रार नगरसेवक राजेंद्र हिवराळे यांनी याप्रसंगी केले.
मुक्ताईनगर मतदार संघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर अशा तीनही तालुक्यातील जवळपास सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते तसेच ग्रामस्थ शिवसेना चे पदाधिकारी उपस्थित होते.