कॉमेडीयन भारती सिंहसह पतीला जामीन मंजूर

0

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंहच्या मुंबई येथील निवासस्थानी गांजा आढळून आला होता. या प्रकरणात भारती सिंहसह तिचा पती हर्ष लिंबाचिया याला अटक करण्यात आली होती. काल रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान आज सोमवारी जामिनासाठी कोर्टात धाव घेतली असता कोर्टाने भारती आणि तिच्या पतीला जामीन दिली आहे. एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केली आहे.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी कॉमेडी किंग भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा मारला होता. यावेळी भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली या दोघांनी दिली असल्याचं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.