कॉमेडीयन भारती सिंहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंहच्या घरी गांजा आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भारती सिंह आणि तिचा पती हर्षल लिंबाचिया याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आज रविवारी २२ रोजी कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंह आणि पती हर्षल ४ डिसेंबर पर्यंत कोठडीत राहणार आहे. मुंबई येथील घरातून अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती, त्यात गांजा आढळून आला. दोघांनी गांजा घेतल्याची कबुली देखील दिली आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील अमली पदार्थाचे रॅकेट उघडे झाले आहे. ड्रग्ज प्रकरणात दिग्गज अभिनेता, अभिनेत्रींची चौकशी झाली. अभिनेत्री दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांचा समावेश होता. त्यानंतर आता गांजा प्रकरणात भारती सिंहला अटक झाली आहे.