कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा स्क्वाड्रनकडून सन्मान !

0

नवी दिल्ली: विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. अभिनंदन वर्थमान यांच्या धाडसाचे कौतुक जगभर झाले. आता वायुदलाकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा विशेष सन्मान करणार आहेत. पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बरोबर तेरा दिवसांनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वाची कामगिरी बजावली ती अभिनंदन वर्थमान यांनी. त्यांनी पाकिस्तानचे हवाई हल्ला करणारे विमान खाली पाडले. ही कामगिरी बजावत असताना अभिनंदन यांचे विमानही अपघातग्रस्त झाले.