लवकरच मेहुल चोकसी भारतात परतणार !

0

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी भारतातून फरार झाला असून तो सध्या अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. दरम्यान लवकरच त्याला भारतात आणण्यात येणार आहे. चोकसी लवकरच चोकसी हे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी सांगितले आहे. यासाठी भारताकडून बराच दबाव आणला जात असल्याचे देखील ते म्हणाले.

चोकसीचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे देखील ब्राऊन यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नसल्याचं ते म्हणाले. पीएनबीमध्ये 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदी आणि मेहुल चोकसीवर आहे. 2018 मध्ये हे प्रकरण उजेडात आले. तेव्हापासून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.