मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाबाबत मुखमंत्र्यांकडे तक्रार

0
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाबाबत मुखमंत्र्यांकडे तक्रार खासदार रक्षा खडसे यांनी तक्रार केली. शासकीय ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व इतर बाबींविषयी वेळोवेळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबधित विभागांना वेळोवेळी पाठपुरावा व तक्रार करूनही कोणतीही सुधारणा तसेच कारवाई होत नसल्याने  खासदारांनी आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा सूचक इशारा दिला आहे.
रुग्णालयात बीटीसीटी आणि सीबीसी तपासणीची सुविधा असूनही तपासणी होत नाही. कर्मचारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा अधीक्षक, सफाई कामगार, परिचारिका हे कायमस्वरूपी कर्मचारी असुन सुद्धा दररोज तसेच वेळेवर कामावर येत नाहीत. आरोग्य सेवा पूर्णता कोलमडली असून गोरगरीब जनतेला उपचाराअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.