काँग्रेसकडून आमदारांसाठी १०० रुम बूक

0

बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये १०० केल्या आहेत, जिथे काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम असणार आहे. भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्यावेळी जी राज्यसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळीही याच रिसॉर्टमध्ये आमदारांना ठेवण्यात आले होते.

आज विधीमंडळाची बैठक

कर्नाटकात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.