मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर कॉंग्रेस, जेडीएसचे आंदोलन

0

बंगळूर-कर्नाटकात भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांना अखेर भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास नकार दिला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.

काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खरगे आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. रिसोर्टवर थांबलेले दोन्ही पक्षांचे आमदारही धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.