निवडणुका बॅलेट पेपरने घ्यावे ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

0

पुणे :- अनेक निवडणुकांमध्ये ईव्हिएम मशिनचा घोळ होत असल्याचा आरोप करत निवडणुका बॅलेट पेपरने घ्यावे, या मागणीसाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत आंदोलन केले. ससून हॉस्पिटलजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन केलं.

ईव्हीएम मशीनचा फेरविचार व्हायला हवा
निवडणुका पारदर्शी झाले पाहिजे याकरिता सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सरकारला देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा निर्देश देऊन स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मात्र अजूनपर्यंत कोणताही खुलासा केलेला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. कर्नाटकसह अनेक निवडणुकांमध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनचा फेरविचार व्हायला हवा. अनेक मोठ्या देशांमध्येही बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. त्याधर्तीवर आता या सर्व निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर व्हाव्यात या मागणीसाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे.