पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले-कॉंग्रेस

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ट्वीटर वरून संपूर्ण देशात वीज पोहोचली असल्याचे जाहीर करत, संपूर्ण देशात वीज पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितले आहे. मात्र पंतप्रधानांच्या दाव्याला कॉंग्रेसने विरोध केला असून पंतप्रधान पुन्हा एकदा खोटे बोलल्याचे आरोप कॉंग्रेसने केले आहे. अद्यापही देशातील अनेक गावे अशी आहेत ज्याठिकाणी वीज पोहोचलेली नाही. छत्तीसगड राज्यातील १२२ गावात अद्यापही पोहोचलेली नाही. खुद्द छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ.रमणसिंह यांनी राज्यात १२२ गावात वीज पोहोचविण्याचे काम बाकी असल्याचे सांगितले आहे.