मुंबई: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन दिवसात लागण्याची दाट शक्यता आहे. काही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्ष विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पहिल्या यादीत ५० उमेदवारांचे नाव असणार आहे.
आजच राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित केले. तर गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवार यांनी जाहीर केले.