सोनिया गांधी, डॉ.मनमोहन सिंग चिंदबरम यांच्या भेटीला !

0

नवी दिल्लीः आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी तिहार तुरूंगात असलेल्या माजी गृहमंत्री काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तिहार तुरूंगात भेट घेतली. गेल्या एका महिन्यापासून चिदंबरम हे तुरूंगात आहे.

आयएनएक्स प्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली होती. 21 ऑगस्ट रोजी सीबीआय आणि ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. महिनाभरापासून चिदंबरम तुरूंगात असून, गेल्या आठवड्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना सुरूवातीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. सीबीआयबरोबरच सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.