कॉंग्रेसकडून हे असणार उमेदवार; पहिली यादी जाहीर !

0

मुंबई: राष्ट्रवादी- कॉंग्रेस आणि इतर घटक पक्ष मिळून आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी आज शुक्रवारी जाहीर होणार आहे. ५० उमेदवारांच्या नावाची आज घोषणा घोणार आहे. एका वृत्तवाहिनीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, यांची नावे आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत असल्याने ते लोकसभा पोटनिवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट होते. पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत.

संभाव्य उमेदवारांची यादी

बाळासाहेब थोरात – संगमनेर
अशोक चव्हाण: भोकर
पृथ्वीराज चव्हाण: कराड दक्षिण
विजय वडेट्टीवार:ब्रह्मपुरी
अमित देशमुख:लातूर
धीरज देशमुख:लातूर ग्रामीण
के.सी पडवी:अक्कलकुवा
नसीम खान:चांदिवली
वर्षा गायकवाड:धारावी
अमीन पटेल:मुंबादेवी
यशोमती ठाकूर:तिवसा
विश्वजीत कदम:पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील:कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील:करवीर
बसवराज पाटील:औसा
मधुकर चव्हाण:तुळजापूर
वसंत चव्हाण:नायगाव, (नांदेड)
डी पी सावंत :नांदेड उत्तर
कैलास गोरंट्याल:जालना
कल्याण काळे:फुलंब्री
सुरेश वरपूडकर:परभणी
डॉ. संतोष तारफे:कळमनुरी
वसंत पुरके:राळेगाव
रणजित कांबळे: वर्धा
अमर काळे :आर्वी
सुनील केदार :सावनेर
हर्षवर्धन सपकाळ:बुलढाणा
माणिक जगताप:महाड
रमेश बागवे:पुणे कँटोन्मेंट