भय्युजी महाराज यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी – मानक अग्रवाल

0

इंदूर :- भय्युजी महाराज यांनी आज दुपारी इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. आत्महत्या करण्यापूर्वी भय्युजी महाराज यांनी सुसाइड नोटही लिहिलेली होती. माझ्यावर असलेला तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करतो आहे असे लिहिलेले होते. अशात भय्युजी महाराज यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

भय्युजी महाराज्यांना मध्यप्रदेशातील शिवराज सिंह सरकारने आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतो तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या अशी मागणी केली होती. या मागणीमुळे भय्युजी महाराज तणावाखाली होते, असा आरोप काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी केला. त्याचमुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशातले संस्कृती, ज्ञान आणि समाजसेवा जपणारे व्यक्तीमत्त्व हरपले आहे. त्यांचे विचार कायमच प्रेरणा देत राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.