जयपूर: दोन दिवसापूर्वी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा विषय आहे, मात्र कॉंग्रेसला हे आवडलेले नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राजस्थानमध्ये प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. देशाची सुरक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत असून काँग्रेसला हे आवडत नाही आहे अशी टीकाही मोदींनी केली आहे.
मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय निवडणुकीच्या काळात का घेतला गेला? असा प्रश्न कॉंग्रेस करत आहे. यावर टीका करतांना मोदींनी आधी संयुक्त राष्ट्राने काँग्रेसला विचारायला हवे होते की, मॅडमजी तुम्ही ज्यांना साहेब म्हणून बोलवता त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करु का ? तुम्हाला काही समस्या तर नाही ना, असा टोला लगावला आहे.