कॉंग्रेस सहा आजाराने ग्रस्त-मोदी

0

बंगळुरू – कर्नाटक निवडणुकीचा ज्वर दिवसागणिक वाढतच चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसला ६ आजार जडले असून त्यामुळे कर्नाटकच्या भविष्याचे पार वाटोळे झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष सध्या सहा आजारांनी ग्रस्त आहे आणि हे आजार जिथे पसरू शकतात तिथे काँग्रस पसरवत आहे. काँग्रेस कल्चर (संस्कृती), कॉम्यूनिलिझम (सांप्रदायिकता), कास्टिझम (जातिवाद), क्राईम (गुन्हे), करप्शन (भ्रष्टाचार) आणि कॉन्ट्रॅक्ट (ठेकेदारी) आदी सहा आजार कॉंग्रेसला जडले आहे असा आरोप मोदी यांनी केला आहे.

जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे रिमोट कंट्रोल १० जनपथ येथे होते. चार वर्षांपूर्वी आपण केंद्रात भाजप सरकार बनवले आहे. मात्र आमचे रिमोट कंट्रोल १२५ कोटी भारतीय आहेत. हेच माझे हाय कमान आहेत, असेही ते म्हणाले.