कॉंग्रेस महिला सक्षमीकरणाची सोंग करते-मोदी

0

बंगळूर-तिहेरी तलाक प्रथेविरोधात सरकार करीत असलेल्या कायद्याला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. तरीही ते महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी कशी करतात ? असा सवाल मोदींनी काँग्रेसला केला. तिहेरी तलाक या अमानूष प्रथेविरोधात केंद्र सरकार करीत असलेल्या कायद्याला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. तरीही ते महिला सक्षमीकरणाच्या बाता कशा काय करु शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला. कॉंग्रेस केवळ महिला सक्षमीकरणाचा सोंग करते असा आरोपही त्यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये विजयपुरा येथील निवडणुक प्रचार सभेत ते बोलत होते. मोदींनी यावेळी काँग्रेसवर टीका केली.

कर्नाटकात महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे सरकार काहीही करीत नाही. तर, केंद्रातील भाजपाच्या सरकारने मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला आहे असे मोदी यांनी सांगितले. विजयुपरमधील प्रचार दौऱ्यात मोदींनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या. कर्नाटकात जर भाजपाचे सरकार आले तर येथे अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर येथे हॉर्टिकल्चरला प्रोत्साहन दिले जाईल. यावेळी भुमिहीन आणि शेतमजूरांसाठी एक लाख रुपयांच्या वीम्याची घोषणाही मोदींनी केली.

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना मोदी म्हणाले, कर्नाटकात असा कोणता मंत्री आहे का ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. सिंचन मंत्र्यांच्या घोटाळ्यांची माहिती घराघरातील लोकांना माहिती आहे. ठेकेदारांशी त्यांचे नाते काय आहे, असा सवाल करताना इथल्या ठेकेदारांच्या कपाटांतून नोटांचे बंडले निघत होती. हे ठेकेदार कोणाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून फिरत होते, असे प्रश्नही त्यांनी यावेळी विचारले.

जेव्हा कर्नाटकात दुष्काळ पडला होता तेव्हा कर्नाटकचे मंत्री दिल्लीत बसून राजकारण करीत होते. दिल्लीत ५० वर्षे काँग्रेसचे राज्य होते. मात्र, त्यांनी भगवान बसवेश्वरांची मुर्ती संसदेत लावली नाही. ती मुर्ती अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने लावली. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भगवान बसवेश्वरांबाबत जगभरात जनजागृती केली जात आहे. कर्नाटकातील संतांनी आणि मठांनी गरीबांसाठी जे काम केले आहे तेच आता राज्याची ताकद बनले आहे. दरम्यान, मोदींनी केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांचा पाढा देखील यावेळी वाचला.