लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केल्यानंतर काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ८० मतदारसंघात लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतले आहे. सर्व जागा कॉंग्रेस लढविणार असून निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असे काँग्रेस ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.