चित्रदुर्ग – कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून, अनेक राजकीय पक्षांच्या प्रचाराने चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रचार सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान एका प्रचारसभेत तप्रधान मोदी यांनी राजकीय फायद्यासाठी सुल्तानांची जयंती साजरे करण्यात काँग्रेस आघाडीवर असल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान मोदी चित्रदुर्ग येथील एका सार्वजनिक सभेत बोलत होते.
चित्रदुर्गमध्ये ओनाके ओबवा या महान महिलेने सुल्तानाला विरोध केला होता. आपल्याला तिचे शौर्य आठवणीत आहे. मात्र, काँग्रेसला मतांच्या राजकारणासाठी इतिहासातील या शौर्याचा विसर पडला आहे. काँग्रेस नेत्यांकडे बघा, त्यांना कोणाची आठवण आहे व कोणाचा उत्सव करत आहेत. काँग्रेस सुल्तानांची जयंती साजरी करण्यात आघाडीवर आहे. काँग्रेसने चित्रदुर्गच्या लोकांचा अपमान केला आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.