दिल्ली-मोदी सरकार गेल्या चार वर्षात सर्वच आघाडीवर अपयशी ठरली आहे. तरुणांना रोजगार, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला हमी भाव नाही, दलित अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय अशा विविध बाबींवर सरकार अपयशी ठरली आहे. या निषेधार्थ कॉंग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून उद्या रविवारी रामलीला मैदानवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा असणार आहे. सकाळी ९.३०वाजता मोर्चास सुरुवात होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन देखील राहुल गांधी यांनी केले आहे.