महाभियोगाबाबतची याचिका काँग्रेसने घेतली मागे

0

नवी दिल्ली-सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळल्याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र, काँग्रेसने ही याचिका आज अचानक मागे घेतली. अपुऱ्या संख्याबळांच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा.

सुप्रीम कोर्टातील कथीत गैरप्रकाराबाबत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप करीत काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांनी त्यांना सरन्यायाधीशपदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला होता.

त्यासाठी त्यांनी राज्यसभेत नोटीसही पाठवली होती. मात्र, राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली होती. उपराष्ट्रपतींना हा प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार नाही, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या निर्णयोविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती.