काँग्रेस सत्तेचा भुकेला

0

नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला सत्तेची भूक असल्याचे ट्विट केले. काँग्रेसने रामलीला मैदानावर जन आक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला सुरूवात होण्यापूर्वी अमित शाहांनी हे ट्विट केले. एक घराणे व त्यांचे दरबारी ज्यांना राज्याराज्यातील जनादेशाने दूर सारले ते आता आपण जनआक्रोशाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा आव आणत आहेत. आजची काँग्रेसची रॅली परिवार आक्रोश रॅली आहे,” असे शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसला जन आक्रोश बघयाचा असेल तर त्यांनी प्रत्येक निवडणुकीनंतरचे निकाल बघायला हवेत. तिथे त्यांच्या पक्षाला देशाच्या लांबी-रुंदीतील प्रत्येक भागात पराभव स्वीकारावा लागला आहे,” असेही शाह म्हणाले.