जन आकांक्षा रॅली: ‘मोदीजी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे काय झाले’?-राहुल गांधी

0

पटना-आज बिहारमधील पटना शहरात कॉंग्रेसची जन आकांक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित जनसमुदायाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी राहुल गांधींनी प्रश्न केले. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते, त्याचे काय झाले? मिळाला का रोजगार? असा प्रश्न राहुल गांधींनी यावेळी केला.

यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राफेल करारात ३० हजार कोटी अनिल अंबानीच्या घशात घातल्याचे आरोप राहुल गांधींनी केले.

तसेच यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस जोरदार कामाला लागली असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस ‘बॅक फूटटवर नाही तर ‘फ्रंट फूट’वर असणार आहे. तर बिहारमध्ये लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्या सोबत कॉंग्रेस ‘फ्रंट फूटवर राहून षटकार मारणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला.