रांची: झारखंड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला जोरदार झटका बसला आहे. माजी खासदार आणि झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस नेते डॉ.अजय कुमार यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपचे उपाध्यक्ष मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. अजय कुमार ‘आप’मध्ये गेल्याने कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडले आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात नेते भाजप-सेनेत गेले आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला बसणार आहे.