नवी दिल्ली: कलम ३७० रद्द झाल्यानंतर देशातील राजकारण तापले होते. सरकारने ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरच्या जनतेवर अन्याय केल्याचे आरोप करत विरोधकांनी जम्मू-काश्मिरात जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र परवानगी नाकारण्यात आली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. अखेर कोर्टाने कॉंग्रेस नेते जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मिरात जाण्यास सशर्त परवानगी दिली होती. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर आजपासून गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामुल्लसह विविध ठिकाणी भेट दिली असून तेथील परिस्थितीची माहिती घेतली आहे.