बंगळूर: कर्नाटक सरकार संकटात सापडली आहे. कॉंग्रेस-जेडीएसच्या जवळपास १३ आमदारांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस-जेडीएस नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत सरकार टिकविण्याबाबत खलबते सुरु अआहे. या बैठकीत जेडीएस नेते एचडी रेवण्णा, एचके कुमारस्वामी, डी.के.शिवकुमार आदी उपस्थित आहेत.