ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सरचिटणीसपदाचा राजीनामा

0

भोपाळ: लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु आहे. सुरुवातील पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यानतंर आता काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विवटरवरून दिली राजीनाम्याची माहिती.

लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत, मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला आहे. मला ही जबाबदारी आणि आमच्या पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या अगोदर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.