नवी दिल्ली-निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यामुळे काँग्रेसने ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन करण्यात आले होते अखेर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. गुजरात निवडणूकी दरम्यान अय्यर यांनी मोदी यांच्यावर नीच प्रवृत्तीचा माणूस असा शब्दात टीका केलेली होती, त्यानंतर सर्वत्र काँग्रेसवर टीका होऊ लागली होती त्यामुळे अय्यर यांचे निलंबन करण्यात आले होते.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली. या निवेदनानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय अनुशासनात्मक समितीच्या विनंतीनुसार अय्यर यांच्यावरील निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अय्यर यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. राहुल गांधी यांनीही याचा निषेध केला होता. त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत अय्यर यांना निलंबित केल्याची माहिती दिली होती. ही कृती म्हणजे काँग्रेसचे गांधीवादी नेतृत्व आणि विरोधकांप्रती सम्मानाची भावना असल्याचे सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पक्षाने मणिशंकर अय्यर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केले आहे.