BREAKING…नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा !

0

चंदिगढ: नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे पंजाब सरकारमधील मंत्री कॉंग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी पाठविला आहे. याबाबतची त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत आज १४ जुलैला खुलासा केला आहे. दरम्यान, राजीमाना दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मतभेद होते. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.