नवी दिल्ली:कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचीक सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांनी अंतरिम संरक्षण मिळवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जायला हवे. शिवाय न्यालयाने कनिष्ठ न्यायालयास आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी माजी अर्थमंत्र्यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर विचार करण्यास सांगितले आहे. याचवेळी हे देखील आदेश दिले आहेत की त्यांना तिहार तुरूंगात पाठवले जाणार नाही आणि जर कनिष्ठ न्यायालय त्यांचा जामीन अर्ज फेटाळत असेल तर त्यांची सीबीआय कोठडी ५ सप्टेंबर पर्यंत वाढवली जावी. आज सोमवारी चिदंबरम यांची सीबीआय कोठडी संपणार आहे. तत्पूर्वी हा निकाल देण्यात आला आहे.
पी चिदंबरम यांच्यावतीने न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. पी चिदंबरम हे ७४ वर्षांचे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले जावे,अशी मागणी सिब्बल यांनी केले. ज्यानंतर न्यायालयाने अंतरिम संरक्षणासाठी पी चिदंबरम यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले.