नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकी सुरु असतांना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. आज दुपारी त्यांनी मातोश्री गाठत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रवेश केला. कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून कॉंग्रेस सोडले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले.
काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदीं यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जात असल्याचे विधान केले होते. याबद्दल त्यांनी एक ट्विट केले होते. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केले होते. काही माणसे मेहनत करुन पक्षात आपले स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिले जात असल्याचे चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.